मुख्य पान



महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांच्या निवडक साहित्याचा हा ऑनलाईन संग्रह....

Maharshi Vinod महर्षी विनोदांचे थोडक्यात वर्णन:
१२ जानेवारी १९०२ ते १३ जुलै १९६९ (अवघ्या ६७ वर्षांचं आयुष्य)

कोकणातील ग्रामीण भागातून आलेला मुंबईत शिक्षण घेणारा युवक,
हळव्या मनानं इंग्रजीतून कविता करणारा कवि,
अंमळनेर तत्वज्ञान मंदिरात राहून 'पी.एच.डी.' मिळवणारे तत्वज्ञानी,
थोर देशभक्त, शहीद, भगत सिंगांच्या अंतरंगातील कडवे क्रांतिकारक,
४ वर्षे भूमिगत राहून, हिमालयामध्ये (भारत व तिबेट) सर्वदूर व अगम्य ठिकाणी पदभ्रमण केलेला, सद्गुरूंचा शोध घेणारा साधक-यात्री,
अनंतता-क्षुद्रता-ब्रह्मास्मि या विषयांवर अभंग रचणारा व ते गुणगुणणारा संत,
नाथपंथातील थोर सिध्दपुरुष (शंकरदास),
देशोदेशी विद्वत्-सभा गाजवणारा उत्तम वक्ता,
षट्-दर्शनांचे जाणकार-'दर्शनालंकार',
करवीर पीठाच्या शंकराचार्यानी गौरविलेले 'न्यायरत्न', ३ वर्षे, जगातील प्रत्येक देशात शांतिचा संदेश देणारे व टोकियो मध्ये गॊरविलेले 'विश्व-शांति-सचिव',
विविध देशांतील, दुर्गम स्थळी असणाय्रा व अतींद्रिय शक्ती असणाय्रा साधू-संत-सत्पुरुष-सिध्द-महात्मे यांच्याशी, भेट-चर्चा केलेले जिज्ञासू,
न्यूयॉर्क मधील आधुनिक व अभिनव प्रयोगशाळेत, डॉ. फायफर यांना, स्वतःच्या अतींद्रिय शक्तींवर संशोधन करू देणारे महान योगी,
डॉ. फ्रॉईड प्रणीत संस्थेमध्ये सायकोएनालिसिस या विषयात पी.एच.डी. केलेले 'सायकोथेरपीस्ट'
नोबेल विजेते डॉ. आईन्स्टाईनशी गणित विषयावर चर्चा करणारे संशोधक,
देशोदेशीच्या विद्वान-साहित्यिक-तत्वज्ञानी-विचारवंत-समाजसुधारक-कलावंतांशी अंतरंगाचं नातं असणारा सुह्रुद,
ग्रामीण अशिक्षित शेतक-यापासून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीशी आपुलकीचा संवाद साधू शकणारा साधू,
Syndicate content