You are hereभारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी
भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी
भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी
भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी:
तत्कालीन विविध मासिकांचे संपादक, महर्षींकडून सन्मानपूर्वक साधनासूत्रे लिहून घेत असत. ते परदेशांमध्ये गेले तरी त्यात खंड पडला नव्हता.
चैत्रापासून ते फाल्गून महिन्यापर्यंत जे महत्त्वाचे सण भारतभर साजरे केले जातात,
दीपावलीचें रहस्य
'ज्ञानदूत' हा एक स्वर्गीय देवदूत आहे. एका 'तारे'चे बोल ऐकत ऐकत तो शरदऋतूमध्यें,
प्रत्येक दिवाळीला महाराष्ट्र-शारदेसाठीं एक अभिनव महावस्त्र घेऊन येतो.
या वर्षीची ही पांचवी भाऊबीज तो दैवी संपत्तीच्या 'अमित' वैभवाने साजरी करीत आहे.
दीपावलीचें सनातन स्वरूप
सनातन स्वरूप
अल्पांचें व स्वल्पांचें महत्त्व आपण ओळखीत नाहीं. स्वल्पविराम घेण्याची वृत्ति आणि शक्ति असणें
ही मानवी जीवनांतली सर्वोत्कृष्ट कला आहे. पण आपण त्या कलेकडे नेहमीं दुर्लक्ष करतों.
लहानगी दीप कलिका
(१)
विद्युत्प्रकाशाच्या झगझगाटानें दीपावलीचें सत्यस्वरूप, अन्त:स्वरूप प्रकट होत नाहीं. न्यूयॉर्क
मधला टाईमस्क्वेअर, प्रत्येक रात्रीं मध्यान्हाला लाजवणा-या विद्युत्प्रकाशाच्या वणव्यानें पेटलेला
अल्पांचें व स्वल्पांचें अंत:स्वरूप
पृथ्वीचा मानदंड असणा-या हिमालयाची भव्यता व दिव्यता इवल्याशा हिमबिंदूतही संपुटित झालेली असते.
'सुद्धा' व 'च'
महाराष्ट्राच्या भव्य शब्दसृष्टींतून एक शब्द सूर्यफुलासारखा निवडतां येईल. हा शब्द खरोखरच
सूर्यासारखा जन्मभर, जीवनभर नवचैतन्य व प्रकाश देत राहील. तो शब्द म्हणजे 'सुद्धां'.
विजयादशमी : नवा अर्थ
श्रौत अग्नीच्या दोन भार्या प्रसिद्ध आहेत - एक स्वाहा, दुसरी स्वधा.
अग्नीत झालेलें हवन स्वाहा ही देवतांना पोहोंचविते व स्वधा पितरांना पोहोंचविते.
उज्ज्वल मानवी देहाच्या ठिकाणीं ज्या इंद्रिय-शक्ति आहेत त्या देवताच होत.
जे आनुवंशिक संस्कार आहेत ते पितर होत.
‘श्री भवानी: महाराष्ट्र माऊली’
श्री भवानी : महाराष्ट्र माऊली’
भवानी ही भवाची म्हणजे शंकराची शक्ति, आद्य शक्ति होय.
वैदिक परिभाषेंत तिला ‘अजा’ ही संज्ञा आहे.
‘अ-जा’ म्हणजे जिला जन्म नाहीं व म्हणून मृत्यूहि नाहीं, ती.
श्री गणपती
विघ्नकृत व विघ्नचरण अशी मंगलमूर्तीची दोन नांवे गाणपत्य-तंत्रात-प्रसिद्ध आहेत.
विघ्नकृत किंवा विघ्न-कर्ता हें मंगलमूर्तीचें पूर्वांग आहे. विघ्नहर्ता हें मंगलमूर्तीचें उत्तरांग आहे.
विघ्न करण्याची शक्ति व विघ्न हरण्याची युक्ति एकाच देवतेच्या ठिकाणी असणें क्रमप्राप्त व समुचित आहे. जो रचील तोच खचील. जो रचनेची प्रक्रिया जाणील त्यालाच ती रचना उलगडतां येईल. आसुरी शक्तींना, विघ्नें उत्पन्न करूनच, पराजित करावयाचें असते. विघ्नें उलगडणें,
नाहींशी करणें - कुणाला शक्य आहे?
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
