You are hereIndian Religious Festivals

Indian Religious Festivals


भाद्रपद महिना

भाद्रपद महिना

वैशाख महिना

वैशाख महिना

वैशाख शुद्ध पौर्णिमा

वैशाख शुद्ध पौर्णिमा ही श्री गणेशाच्या ‘पुष्टिपती’ या सुप्रसिद्ध अवताराची जन्म-तिथी आहे.
गाणपत्य संप्रदायांत हा अवतार अग्रगण्य समजला जातो.
श्री क्षेत्र कनकेश्वर (ता. अलिबाग, जि. कुलाबा) येथे पुष्टिपतीचा जन्मोत्सव अद्ययावत् सुरू आहे.

गुढी पाडवा

सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी । - ज्ञानेश्वरी: ४-५२

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “सुखाची गुढी उभारण्यासाठी, विश्वसु्खाचा ध्वज उभविण्यासाठी मी युगायु्गांचे ठायी अवतार घेतो, हे खरे, पण ही गुढी, हा ध्वज मी स्वत: उभारीत नाही. जे सज्जन असतील, त्यांच्याकडून मी हे तोरण उंचवितो. सीमेला पोंचलेला अ-धर्म मी नष्ट करतों. अनेक दोषांनी, प्रमादांनी व पापांनी काळवंडलेली कर्म-लिखितांची बाडेच्या बाडें मी नष्ट करतों.”

मनुष्य स्वभावत:च पूजक वृत्तीचा आहे.

मनुष्य स्वभावत:च पूजक वृत्तीचा आहे.

- पश्यन्ती (१४) (रोहिणी सप्टें. १९६३)

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------