प्रकाशित साहित्य

    सौंदर्याचा आत्मा समन्वयात आहे. विविधतेतले एकत्व प्रतीतीला आले की सौंदर्यनिष्पत्ती होते. सौंदर्य म्हणजे हेतूदर्शन. आकृतीतला शब्द, योजनेतला रंग, संगतीतला हेतू उमगला की सौंदर्याच्या दर्शनलहरी हेलावू लागतात.

    ‘नहिं मरुं निर्जलं दृष्ट्या पुनर्दूरात्‌ प्रतीयमानं जलं आदातुम्‌ पातुम्‌ वा विवेकी गच्छति।’ - शंकरानंदी
    हे मृगजळ आहे असे समजल्यावर विचारी मनुष्य ते घरी आणण्यास किंवा पिण्यास धाव घेणार नाही.

    अनुभव शब्दाचा अर्थ, न्यायदर्शनात व निरुक्तिशास्त्रात बुद्धी असा सांगितला आहे.

    लोकसमुदाय हे संस्कृतीचे अधिष्ठान आहे.
    मानवी जीवनाच्या स्वभावसिद्ध सामुदायिक स्वरूपामुळे व्यक्तिमात्राच्या ठिकाणी विशिष्ट गुणांची अभिवृद्धी होणे नैसर्गिक, क्रमप्राप्त व अवश्य असते.

    विराग म्हणजे वैराग्य.
    रागाच अर्थ रंग. रंग नसलेली, विकृती नसलेली, चित्ताची मूलस्थिती किंवा सहजता हेच वैराग्य होय. ‘सह्जता’ अशी काही अवस्था असू शकते, हेच आपणास माहीत नसते; कुणी सांगितले तर पटत नाही.

    इच्छा ही जीवनाची आद्यशक्ती आहे.
    विश्वनिर्मिती ही ईश्वराच्या इच्छाशक्तीचा परिणाम आहे.
    इच्छाशक्तीचे विकसन काही स्वयंभू, स्वाभाविक नियमांनी होऊ शकते.
या नियमांचा एकंकार म्हणजे धर्म.

    प्रत्येक वस्तूची प्रतीती हा एक दर्पण आहे. या प्रतीतीत वस्तूच्या ज्ञानापेक्षा स्वत:च्या तत्कालीन आत्मस्थितीचे भान स्पष्टतर व तीव्रतर असते.

    एका पडक्या देवळात ती भंगलेली घंटा दिसली.
    निर्नाद झालेल्या त्या घंटेने काय संदेश दिला?
    मौन, मौन, मौन.

    उच्चोत्तम विचारांचे दाणे रक्तात भिजत घालावे लागतात - तरच त्यांना कोंब फ़ुटतो.
    रक्त हे जीवनाचे प्रात्यक्षिक व प्रतीक आहे.

    ‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे ऋग्वेदातील महावाक्य आहे. प्रज्ञान म्हणजे ज्ञानाचे ज्ञान; ‘मला ज्ञान आहे’ हे ज्ञान. याला इंग्रजीत - Self-Consciousness किंवा Reflective-Cognition असे म्हटले जाते.

Syndicate content