You are hereमहर्षी विनोद यांच्या विषयी

महर्षी विनोद यांच्या विषयी


महर्षी विनोदांचे थोडक्यात वर्णन sticky icon

१२ जानेवारी १९०२ ते १३ जुलै १९६९ (अवघ्या ६७ वर्षांचं आयुष्य)
कोकणातील ग्रामीण भागातून आलेला मुंबईत शिक्षण घेणारा युवक,
हळव्या मनानं इंग्रजीतून कविता करणारा कवि,
अंमळनेर तत्वज्ञान मंदिरात राहून 'पी.एच.डी.' मिळवणारे तत्वज्ञानी,

Location of Shanti-Mandir

Location of Shanti-Mandir:

Address

Address :

Shanti-Mandir, 2100 Sadashiv Peth,
Vijayanagar Col., Behind S.P. College,
Pune: 411030.
Maharashtra State, India.

Phone no. 020-24338120/24330661

शांति-मंदिर

शांति-मंदिर:

आमचा पत्ता:
शांति-मंदिर, २१००, सदाशिव पेठ, विजयानगर कॉलनी,
एस.पी. कॉलेजच्या मागे,
पुणे: ४११०३०
महाराष्ट्र राज्य,
भारत

आंबेजोगाई: कुलस्वामिनी श्रीयोगेश्वरी

आंबेजोगाईची श्रीयोगेश्वरी: कुलस्वामिनी (शक्ति-पीठ)

मु.पो. आंबेजोगाई, ता. परळी, जि. बीड, महाराष्ट्र राज्य

कुलस्वामी श्रीकोळेश्वर:

कुलस्वामी श्री‍कोळेश्वर:

मु.पो.कोळथरे, ता.दापोली, जि.रत्नागिरी, महाराष्ट्र राज्य

विनोदकुलपरंपरा/ About Vinods

Historical perspective of Vinods:

Origin:
The family origin dates back to Tretta-Yug in the days of Shri BhargavRaam Avtaar of Vishnu (many billions years back). He reclaimed a land beside Sahyadri mountain range on west shore in Konkan area (Maharashtra state in India) and called upon 60 Brahmins to settle down on the reclaimed land. He invited brides from Ambejogai in Marathwada area of Maharatshtra and got them married. He formed groups of 6-7 such couples and sent them apart to establish themselves on various places in Konkan.

संत-महात्म्यांची पुण्यतिथी महत्वाची का?

संतमहात्म्यांची पुण्यतिथी त्यांच्या जन्मतिथीपेक्षा अधिक महत्वाची का?
सद्‌गुरु, महात्मे यांच्या रुपाने ईश्वर मानवी देहामध्ये अवतरतो. त्यामुळे त्याचा जन्म इतर सर्वसामान्यांप्रमाणेच दिसतो.

श्रध्दांजली सभा

१) महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, पुणे: २२-०७-१९६९
अध्यक्ष: श्री. हरिभाऊ पाटसकर (पुणे विद्यापीठ कुलगुरू)

अखेरचे आजारपण

आजारपण:

जुलै १९६९ मध्ये महर्षींच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली होती. वेदना असह्य झाल्या होत्या. गॅंगरीन झाले होते. डायबेटीस वाढला होता. पुण्यातील डॉ. घारपुरे यांच्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू होते.

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml