You are hereसाधना सूत्रे

साधना सूत्रे


भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी

तत्कालिन मराठी मासिकांतून संपादक महर्षींकडून साधनासूत्रे लिहवून घेत असत. तो काळ पाश्चिमात्य वार्‍यांमुळे आलेल्या परिवर्तनाचा होता. शास्त्रीय बैठक असेल तर भारतीय तत्वज्ञानाचा व पारंपारिक व्रतवैकल्यांचा व धार्मिक उपचारांचा आम्ही स्वीकार करू अशी आंग्लविद्याविभूषित नवीन पिढी म्हणू लागली होती. जुनाट-बुरसट-कालबाह्य या नावाखाली बर्‍याच धार्मिक उपचारांना घराबाहेरची वाट दाखवली गेली होती. जे देवभीरू-पापभीरू लोक सणवार साजरे करत होते, त्यांना सनातन धर्माची बैठक कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने सांगण्याची गरज होती. महर्षींनी हे काम आनंदाने केले.

प्रत्यभिज्ञा उपनिषद्‌

नोव्हेंबर 1960

प्रत्यभिज्ञा-उपनिषद

ज्ञानाचे स्वरूप ओळखून आत्म-ज्ञान कैवल्य किंवा ब्रह्म-साक्षात्कार घडवणारी अभ्यसनीय विचार-प्रणालि.

सर्व जात मात्र हें मूर्तिमंत मांगल्य आहे. प्रत्येक वस्तु ही सच्चिदानंद तत्त्वाचे स्वरुप-सौभाग्य आहे.

सर्वं खल्विदं ब्रह्म। हे अथर्व वेदाचे महावाक्य सुप्रसिध्द आहे.

आनंद मायोहिसः। अभ्यासात हे बादरायण व्यासांचे ब्रह्मसूत्र देखील या सत्याला व्यक्तविणारा एक वाक्यदीप आहे.

सेंट फ्रॅन्सिसचे पायापाशी

रोमहून फ्लॉरेन्सला जाताना वाटेत `असिसि' हे एक शहर लागते. एका लहानशा टेकडीवर, आजूबाजूस दर्‍याखोर्‍या असलेले व इटलीचे वैशिष्ट्यपूर्ण सृष्टीसौन्दर्य हळुवारपणे दर्शविणारे हे स्थळ म्हणजे पश्चिम संस्कृतीचे एक तीर्थक्षेत्र आहे.
वर्षाकाठी लक्षावधी माणसे येथे येऊन जात असतील - कारण एका महानुभाव ख्रिस्ती संताचे हे जन्मस्थान आहे.
असिसीला इटलीच्या महाकवि डांटे याने "पश्चिममधली पूर्व" (Orient) असे विशेषण दिले, कारण येथे इ.स. ११८९ मध्ये एक सूर्योदय झाला आणि तो सूर्य म्हणजे सेंट फ्रॅन्सिस.

स्फुरण-उपनिषद

जुलै १९६०(श्री ज्ञानेश्वर, कार्ल मार्कस् व हेगेल)
---------
विद्यमान मानवी जीवन सर्वतोपरी उध्वस्त झाले आहे.
याचे कारण मानवाच्या आन्तर जीवनांतल्या विसंगती म्हणजेच अन्तर्विरोध हे होय.
हा अन्तर्विरोध अनेक स्वरुपे धारण करतो. विकृतीरुप असणारा हा अन्तर्विरोध केवळ वैचारीक व बौध्दिक नसतो.
वैचारीक विसंगती, बौध्दिक समस्या ही विकृती नव्हे. मानवाची ती प्रकृती आहे. किंबहुना, मानवाच्या संस्कृतीचे उगमस्थान वैचारिक विसंगती हेच म्हणता येईल.

शरणागति-योग

- १ -
ज्ञानदूताचे हे सातवे दर्शन आहे.
गेली सहा वर्षे प्रत्येक दीपावलीला उच्च सारस्वताचा एक अमृत-कुंभ घेऊन हा स्वर्गीय ज्ञानदूत महाराष्ट्र भूमीवर अवतरत असतो.
एक तारा त्या ज्ञानदूताला आमंत्रण देते. त्याचे भक्तिभावाने आगत-स्वागत करते.
अ-मित आनंद, अमर्याद उत्साह तिच्या मनांत, तिच्या शेजारी खेळत बागडत असतो.

श्रीशंकराचार्य पुण्यतिथी

वैशाख शु.।।१५सोमवार दि.१३ मे १९५७ हा पंच पर्वणीचा दिवस आहे.
आद्य श्रीशंकराचार्य यांची पुण्यतिथी त्या दिवशी येत आहे.
भगवान् बुद्धांचा जन्म, साक्षात्कार व निर्वाण, त्याच दिवशी (वैशाख शु. १५ ला) झाले अशी बौध्दजनांची श्रध्दा आहे.

रोहिणी

(जून - १९६४)

रोहिणी हे नाव आरोहणाचे, आक्रमणाचे प्रतीक आहे.

रोहिणीला आज सतरा वर्षे पूर्ण होऊन ती अठराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

श्रीमती निर्मलादेवींच्या कल्याणकारक राज हस्ताने रोहिणीच्या अठराव्या वर्षारंभ - अंकाचे प्रकाशन होत आहे ही गोष्ट रोहिणीच्या उज्वल भवितव्याचे एक बोलके `प्रसादचिन्ह' आहे. अठरा या संख्येतील दोन घटक अंकांची बेरीज नऊ होते. नऊ हा, संख्याशास्त्रांतील परमोच्य विकास बिंदू आहे. नऊ किंवा त्या आकड्याचे गुणाकार यांचेबद्दल गणित शास्त्रांत कित्येक चमत्कृति उपलब्ध आहेत.

अठराव्या वर्षी किशोर अवस्था संपून `स्त्री' `युवती' होते, स-ज्ञान होते. अधिकारिणी होते.

प्रातिभ आणि परामर्थ

(रोहिणी-फेब्रुवारी १९४९)

पातंजल योगशास्त्रांत `प्रातिभ' नावाच्या एका भूमिकेचा उल्लेख आहे.

प्रातिभ म्हणजे चैतन्याचा एक अवस्थाविशेष आहे. या अवस्थेचा सर्वज्ञत्त्व हा स्वभाव होय.

मानवी बुद्धी पराकोटीला पोहोचली तरी तिला काही गहन अर्थांची ज्ञेयांची, विषयांची प्रतीती होत नाही.

असल्या अर्थांना परम अर्थ, परमार्थ असे म्हणतात.

लौकिक अर्थांचे `प्रत्यक्ष' इंद्रियोन्मुख व विषयोन्मुख बुद्धीला होते.

अलौकिक अर्थांचे `प्रत्यक्ष' आत्मोन्मुख बुद्धीलाच शक्य असते.

बुद्धी हेच अर्थज्ञानाचे व परमार्थ ज्ञानाचे साधन आहे, मात्र अर्थ-ज्ञ बुद्धी ज्ञानेंद्रियांचे सहाय्य घेते.

।। मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

१३) (महाराष्ट्राचे थोर तत्वज्ञ, श्रीजगद्गुरु, केवल अवधूत न्यायरत्न विनोद यांचा नवमहाराष्ट्रला व त्याच्या निर्माण-कर्त्यांना आशिर्वाद व मार्गदर्शन)
लेखक : श्री जगद्गुरु, केवल अवधूत न्यायरत्न विनोद, पुणे.

जीवन-मूल्यानुभव

(ले. अध्यात्म-महर्षि, न्यायरत्न डॉ. धुं.गो. विनोद)

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml