You are hereअभंग
अभंग
अभंग-संहिता भाग २
महर्षीच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांनी लिहिलेल्या अभंगापैकी काही अभंगांवर एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यालाही आता ५० वर्षे होऊन गेली. आमच्याकडे अशा हजारो अभंग लिहिलेल्या वह्या जतन करुन ठेवल्या आहेत. त्यातील अभंग आम्ही महर्षींच्या वेबसाईटवर घातले आहेत. या अभंगांचे इ-बुक मात्र करायचे बाकी होते. आज मार्च २०११ रोजी आम्ही हे इ-बुक प्रकाशित करीत आहोत.
महर्षींचे अभंग म्हणजे विविध उत्कट भावांचा आविष्कार. स्वार्थाकडून परमार्थाकडे वाटचाल करीत असलेल्या एका संताचे उच्छ्वास! आपणही वाचतावाचता काळावेळाचे भान विसरतो.
ही संपदा तुमच्या हाती सुपूर्त करताना खूप बरं वाटतय!
गिळाया मोजके, सुखाचे हे क्षण। सदा पसरी वदन, भूतकाळ।।
सख्या भूतकाला, तुझ्या अन्तरांत।
वेदना त्या सुप्त, किती माझ्या।।
तुझ्या अंगावरी, फेकुनी अनुभव।
शान्त केला जीव, स्वत:चा मी ॥१॥
जन्ममृत्यूंच्या या, पावलांनी दोन। कालाचें हे वन, फिरे आत्मा।।
चक्रनेमिक्रम, विराट विश्वाचा।
असा चालायाचा, निरंतर ॥
जन्ममृत्यूंच्या या, पावलांनी दोन।
कालाचें हे वन, फिरे आत्मा ॥१॥
भवानी पूजेला, आणिले भंडार। वासनांना ठार, करूनीयां।।
भवानी पूजेला, आणिले भंडार।
वासनांना ठार, करूनीयां ॥
मेलेल्या इच्छांनीं, रक्ताळले चित्त।
संपादिलें वित्त, विरक्तीचें ॥१॥
वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म
प्रमादांची शय्या, नीतिवालेसाठीं।
तसें धर्मापोटी, रक्तपात ॥
उषेच्या पूर्वी हा, काळोख पाहणें।
भक्तिला साहणें, विरह-दु:ख ॥१॥
तुझ्याच प्रेमाची मूर्ति माझ्या मनीं। जणूं सिंहासनी अंबामाई।
आणि कोठे गेला तुझा तो विश्वास।
तुझा गूढ हास आनंदाचा॥
मनांत कां आले स्वैर स्वप्न कांही।
चित्त कोठे जाई - भटकाया॥४३॥
फूल हे विश्वाचे वाहिले स्वत:ला। देव भक्त झाला - आज माझा।
प्रति प्रेम नाही तुला देता येत ।
भाव हे अज्ञात गूढ माझें॥
तुझा काय दोष सौंदर्य अंधाला।
भक्ति तर्कटाला - निरर्थक॥३३॥
शून्यता अनंतता मायभू-दीनता। पूजितो देवता - एवढ्याच।
तृप्त होणार्या ह्या क्षुद्र इच्छा माझ्या ।
नांव त्यांचे तयां-कसे द्यावें॥
एक सुद्धा इच्छा थोडकीशी स्वैर।
सफळ ना होणार जीविती या ॥
अशा या ठरलेल्या जीवनक्रमांत।
कसे कां हें चित्त व्यग्र माझे ॥२२॥
सदां दृष्टीपुढे उच्च ध्येय येतें। वासना वैरिणी टाकिते झांकुनी।
कशाला पूजावे सत्य हे कळलेले।
ध्येय लाधलेले नको मला ॥
अज्ञेय सत्याचा - अप्राप्य प्रेमाचा।
अश्राव्य गीताचा - भुकेला मी॥२०॥
सत्य जें जें वाटे - बुद्धिनेत्रा माझ्या। दिसे ते उफराटे - दुज्या क्षणी।।
तुझा जो भासला ओंठ स्वप्नकाली।
असे तीन पाकळी फुलाचीच ह्या ॥
देव आता ठरला तसा मनाचा संभ्रम।
आणि तोही देहधर्म - प्रेम माझे॥११॥
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- पुढचे पान ›
- शेवटचे पान »
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.