You are hereपान ९५/२० / पान ९५/२०
पान ९५/२०
कशाला आलीस, नेत्र ध्यानी अंध
कसे दृष्टिबंध, तुला घालू
गीतशब्दे माझ्या, बधिरले हे कान
तुझे प्रीतिगान, कसे ऐकू
निराळे स्थंडिल, नुरे व्यक्तित्वाचे
पूज्यपूजकांचे, ऐक्य झाले
चित्त माझे हेच, तुझे क्रीडाशैल
येथ तू फिरशील, चिरंतन
नको टाकू दृष्टि, स्वैर इकडेतिकडे
पाऊल वाकडे, पडायचे
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
Tags
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.