You are hereपान ८८/१३ / पान ८८/१३
पान ८८/१३
तरंगू लागला, काळोख भवताली
अंतरात आली, एक इच्छा
गीततेजे माझ्या, आकाश उजळावे
तेजगीते यावे, मनी माझ्या
मनात चांदणे, नभामध्ये गीते
असे दृश्य दिसते, किती रम्य!
उगाच फिरताना, दमले माझे पाय
वनी फिरे गाय, एकली ही
हंबरडा फोडिते, कुणासाठी सांगा
नाहीतरी लागा, पुढे चालू
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
Tags
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.