You are hereआठवे पाऊल / आठवे पाऊल
आठवे पाऊल
“हे लानू, तुझे डोके जरा वर कर. तुला एक ज्योती दिसते का? तुझ्या ऊर्ध्वभागी असलेल्या अनंत ज्योती तुला दिसतात का? मध्यरात्रीच्या कृष्णघन नभोवितानात या ज्योती तळपत आहेत.
“गुरुदेव, एक दीपशिखा माझ्या प्रतीतीत येत आहे. त्या दीपशिखेत अगणित आणि अविभक्त अशी अनेक स्फुल्लिंगे चमकताना मला दिसत आहेत.”
“तुझे म्हणणे यथार्थ आहे. आता तू स्वत:भोवती पहा आणि स्वत:च्या अन्तरंगात पहा. तुझ्या अन्तरंगात जे तेज चमकत आहे, ते तेज तुझ्या बांधवजनांच्या अंतरंगात चमकणार्या तेजाहून कोठल्याही तर्हेने आगळे-वेगळे आहे, असे तुला वाटते का?
“नाही. माझ्या अन्तरंगातले तेज त्यांच्या अन्तस्थ तेजाहून अणुमात्र विभिन्न नाही. पण कर्मबन्धाच्या कारावासात अडकलेला जीव, त्यांच्यामधले अद्वैत ओळखू शकत नाही. बाह्य वेषभूषेने बिचार्या अज्ञ जीवाला संभ्रम होतो. तो म्हणतो, ‘हा तुझा आत्मा आणि हा माझा आत्मा!’ ”
- ‘दि सीक्रेट डॉक्ट्रीन्’, एच्. पी. ब्लॅव्हॅट्स्की, अड्यार आवृत्ती, भाग १ ला, पान १७९
---------------------------------------
त्या स्वर्गीय नीलिम्यात आम्ही बुडून गेलो होतो. किती वेळ आम्ही त्या अवस्थेत होतो - मला काही स्मरत नाही.
वास्तविक कालक्रमणेबद्दल विचार करण्याचे मी सोडून दिले होते. काय असेल ते असो, वेळेची कमतरता आम्हाला कधीच भासली नाही.
एकाएकी मला तो दूरचा प्रतिध्वनी ऐकू आला आणि त्यामुळे मला वर्तमानकाळाचे भान झाले.
“तो माझ्या अंतरात्म्याला शांति देतो!”
“अरे तो आहे कोठे? माझा हिरण्यपुरुष आहे कोठे?”, मी स्वत:ला विचारले, मी अगदी भेदरून गेले होते.
“त्या टेकडीच्या शिखरावर आम्ही पोहोचल्यानंतर, तो दिसला नाही; आणि तो माझा कर्मपशू - तो तर केव्हापासूनच, हिरण्यपुरुषापेक्षाही अधिक काल अदृश्य झालेला आहे.”
“हा मी येथे आहे”, हिरण्य-पुरुषाचे उत्तर आले. त्याच्या मुरलीच्या संगीतलहरींतून त्याचे उत्तर प्रकट झाले. “मी तुझ्या अगदी निकट आहे. इतका निकट आहे की, तू मला निराळा पाहू शकत नाहीस. पण मी येथेच आहे.”
“माझ्या पायांपेक्षा, हातांपेक्षा तू मला अधिक जवळ आहेस!”, मी स्वत:शी पुटपुटले, “त्यामुळे तुझा आवाज माझ्या अंतरंगातून येत आहे, असा मला भास होतो.”
“होय”, त्याचे उत्तर आले. हे उत्तर, हा शब्द, हा ध्वनी बाहेरून आला, की माझ्या अंतरंगातून आला, ते मी सांगू शकत नाही.
“तुझे जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे; त्याचे हे प्रसादचिन्ह आहे, पूर्व-दर्शन आहे.
“अनुभव घे. पहा! स्वामींचे दर्शन किती सुंदर आहे, मधुर आहे, गोड आहे!”, हिरण्य-पुरुष थांबला.
“मला वाटते, मला आता समजू लागले आहे. तू आणि मी एक आहोत असे जेव्हा मला कळेल, तेव्हा मी तुला पाहू शकणार नाही. माझ्या नेहमीच्या ‘मी’ला, तरी आता मी कोठे पाहू शकते?”
“अगदी बरोबर. तुझ्या कर्मश्वानाची तशीच अवस्था आहे”, हिरण्य-पुरुष म्हणाला, “तो कर्मपशू आता जवळ जवळ अदृश्य झाला आहे. अगदी बारकाईने पाहिले, तर तो छायेचा एक बारीकसा ठिपकाच दिसेल. पण थोड्या वेळात तू माझ्याशी एकरूप झालीस, म्हणजे त्याचे अस्तित्व संपूर्ण नाहीसे होईल; कारण तो पशू म्हणजे तुझी छाया. तू स्वयंप्रकाशित झालीस, आत्मरूप झालीस, सूर्यरूप झालीस की, तुझी छाया कशी शिल्लक राहणार?”
“मला आठवते, पूर्वी तू मला हे बोलला होतास; पण आता त्याचा अर्थ मला प्रतीत होऊ लागला आहे”, मी म्हटले.
“साहजिक आहे. समजण्याचा, ग्रहण करण्याचा एकच मार्ग आहे. ह्या वस्तूंचा, अवस्थांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.”
नंतर मी बराच वेळ थांबले. एक दीर्घ श्वास घेतला. आणि पुनश्च एक ध्वनी कानांवर आला.
“सत्याच्या, धर्माच्या मार्गावरून मला परमात्माच नेत आहे.”
“होय. ही सर्वांगसुंदर दरी आता सोडून गेले पाहिजे”, मी स्वत:शी म्हटले व उभी राहिले आणि सभोवार नजर टाकली. माझे सहचर यात्रिक समोरच्या मार्गाकडे निरखून पाहत होते. तो मार्ग आमच्यापुढे लांबच लांब दिसत होता आणि दूरवर निळ्या निळ्या काळ्या छायेमध्ये लुप्त झाला होता. तेथे ती दरी अगदी निरुंद होऊन एखाद्या घळीसारखी दिसत होती.
ही मृत्यूची दरी असली पाहिजे! मी भ्याले होते. माझ्या अंगाला कंप सुटला होता. अर्थातच श्रीगुरुदेव अंतर्धान पावले होते.
“पण आता मला कोठल्याही दुष्ट, अनिष्ट शक्तींची भीती वाटत नाही. कारण तू माझ्याजवळ आहेस.”
हे आकाशवाणीचे शब्द मला स्पष्ट ऐकू आले. नंतर पुन: शब्द आले -
“मयि श्रद्धत्स्व। मी तुझा जीवात्मा आहे!”
आम्ही पुन:श्च मार्गस्थ झालो. येथे ती दरी निर्मनुष्य होती. आमच्याशिवाय चैतन्याची खूण इतरत्र कोठेच दिसत नव्हती. तेथे सिंह नव्हते, वृषभ नव्हते, आकाशात एकही पक्षी नव्हता. भूमीवर निळी गोकर्णीची फुले नव्हती. गवताची हिरवळदेखील तेथे नव्हती. अचेतन, उघडेबोडके खडक काय ते तेथे दिसत होते.
मोठ्या कष्टाने आम्ही आमचे पाय ओढीत होतो. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्या काळ्याकभिन्न छायेत आम्ही पाऊल ठेवणार होतो, तेवढ्यात त्या दलदल-दोस्ताचा, जुन्या दोस्ताचा आवाज ऐकू आला,
“जो अनिश्चित राहत
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.