You are here१९४३ मधील श्लोक / १९४३ मधील श्लोक
१९४३ मधील श्लोक
१९४३:
एकूण श्लोक: ५
६ सप्टेंबर
संध्याकाळी ०६.००
स्वस्ति! मत्स्येंद्र संहिते, श्री वैष्णवि!।
शांते अवधूते सहजे संवित्शांभवि!।
जयश्रिये! संकेतस्थे, शब्दशाबरभैरवि!।
केवलगर्भे! नमोSस्तु ते ।। ।।१।।
चमकली कीं दहरकुहरीं विद्युल्लेखा।
उमटली कीं गुप्तर्थाची बोलकी रेखा।
हेलावली वा रससागरी श्रीमहामत्स्यनौका।
गोरक्षगीता उन्मेषली ।। ।।२।।
कर्पूरज्योतींची तेजाळली राणीव।
अखंडार्थवृत्तीची फेसाळली शहाणीव।
शांतल्या अद्भुताची कल्लोळली जाणीव।
श्री-ज्ञान टीका मुकुलली ।। ।।३।।
श्रीविद्येचा पंथराज नवरसाळ।
नवपीठांत नवनटले श्रीसंकेतश्रियाळ।
उपांत्य अंकीं बीजाक्षर प्रवर्तले प्रियाळ।
अंत्यकोटींत अद्वैतसिद्धी! ।। ।।४।।
घडी घडी मोडली महावस्त्रांची।
धडी धडी भरली बीजाक्षरमंत्रांची।
पुडी पुडी सोडली संकेतरत्नांची।
पंथविद्या ही प्रफुल्लली ।। ।।५।।
संध्याकाळी ०७.००
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.