You are hereशाबरी मंत्रविद्या / शाबरी मंत्रविद्या

शाबरी मंत्रविद्या


शाबरी मंत्रविद्या:

जनक:
श्रीआदिनाथ-उमेच्या तर्फे श्रीमत्स्येंद्रनाथांना ही विद्या प्राप्त झाली. ती त्यांनी श्रीगोरक्षनाथ-श्रीकानीफनाथ यांच्या तर्फे प्रसारित केली.

ग्रंथाचे वैशिष्ठ्य:

यामध्ये मंत्रांचे अनेक संग्रह आहेत. त्यांची रचना पीठ-खंड-पटल अशा तऱ्हेने असून त्यांचे व्यवस्थित संस्करण श्रीगोरक्षनाथांनी केले. या वाक्यांचे किंव वर्णसमूहांचे सामर्थ्य व प्रभाव फार मोठा आहे.
सार्‍या ३३ कोटी देवांनी आपले सामर्थ्य या विद्येला अर्पण केले आहे. ही एक महाविद्या आहे. हिचे सामर्थ्य अफाट आहे.

विद्येचा उपासक कसा असतो-
नीतिमान
सद्वर्तनी
सद्गुणी
सद्विचारी
यम-नियमांचे पालन करणारा
इंद्रिय-दमनी

हिचा उपयोग:
साधनेच्या पहिल्या पातळीवर- रोजच्या व्यवहारातील, संसारातील नाना अडचणींचा, संकटांचा, विविध तापांचा नाश करता येतो.

हिचे नाव शाबरी का?
श्रीआदिनाथांनी जंगलात साधना करत असताना, श्री गौरीला भिल्लीणीच्या रूपात पाहिले. त्यांनी तिला कळेल अशा तिच्या भाषेत समाधिचे गूढ सांगितले. ते श्रीमत्स्येंद्राने ऐकले. हे सर्व मंत्र जीव-ब्रह्माच्या सेवेसाठी आहेत.

आजची या विद्येची स्थिती-
आजची विद्या शाबरी नसून बर्भरी आहे. तांत्रिक कापालिक मूळ शाबरी विद्येचा दुरुपयोग करु लागले हे पाहून नाथांनी ती गुप्त करुन टाकली.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------