You are hereनाथांची वेषभूषा / नाथांची वेषभूषा

नाथांची वेषभूषा


नाथांची वेषभूषा:
नाथपंथीय प्रामुख्याने शिवाचे उपासक असल्याने प्रत्यक्ष शिवाची छाप त्यांच्या वेशभूषेवर आहे.
‘नवनाथ नवकम’ यात वेशभूषेवर एक श्लोक आहे.
१) जटा व दाढी
२) कंथा - भगवे वस्त्र
३) मेखला- २२-२७ हात लांब लोकरीची दोरी
४) मेखली - हस्तभूषण
५) शैली - लोकरीचे ५ अखंड पदर
६) शृंगी - जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची १ इंच लांबीची शिटी. भिक्षेचा स्वीकार केल्यावर ती वाजवतात.
७) पुंगी - ६-८ इंच लांबीची हरणाच्या शिंगाची. भिक्षेच्या वेळी वाजवतात.
८) जानवे - ५-७ पदरांचे, शंखाची चकती, तांब्याच्या तारेने रुद्राक्ष अडकवलेला असतो, त्याच्याखाली शृंगी अडकवलेली असते.
हे जानवे ते सरळ गळ्य़ात घालतात.
९) कुंडल - गुरु आपल्या शिष्यास संन्यास-दिक्षा देताना कान फाडून घालतात. ही मातीची, तांब्याची, सोन्याची, हस्तिदंती किंवा एका विशिष्ठ दगडाची असतात.
१०) रुद्राक्ष - १०८ रुद्राक्षांच्या माळा. एक रुद्र व एक पोवळे, गळ्य़ात दुपदरी सिध्दमाळ घालतात.
रुद्रमाळेत ८४ रुद्र व २४ स्फटिकमणी असतात.
११) दंडा - दीड हात लांब
१२) त्रिशूळ - ज्यांनी केवल कुंभकापासून सामरस्य सिध्दी प्राप्त करुन घेतली आहे, त्यांच्याजवळ हा असतॊ.
१३) चिमटा - याचा अर्थ अग्निदीक्षा घेतलेला साधक
१४) शंख - भिक्षेच्या वेळी वा शिवदर्शनाच्या वेळी साधू शंख वाजवतात.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------