You are hereवैदिक विद्वानांचा परिचय / वैदिक विद्वानांचा परिचय
वैदिक विद्वानांचा परिचय
पुस्तकाचे नाव: वैदिक विद्वानांचा परिचय (भाग २ रा)
लेखक: श्री. सी. वी. केळकर (पुणे वेदपाठशाळा)
प्रस्तावना: महर्षि न्यायरत्न डॉ.धुं.गो. विनोद यांनी दिलेला आशीर्वाद
.........................................................................
बिभेत्यल्पज्ञतात् वेदो मामयं प्रहरिष्यति।- (अत्रि स्मृति)
एकदा वेदपु्रुष भयभीत झाला व उद्गा्रला, “जो अज्ञ आहे, अल्पज्ञ आहे त्याची मला भीती वाटते. कारण तोच माझ्यावर प्रहार करील.”
आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या काळात अज्ञ व अल्पज्ञ यांची संख्याही भयप्रद वेगाने वाढत आहे. साक्षरता, विद्यालयीन व महा्विद्यालयीन शिक्षण याबरोबर जनतेची वेदविषयक अज्ञता म्हणजे अज्ञानच वाढत राहिले आहे.
वेदपु्रुषाची स्वत:वर प्रहार होण्याची भीती लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणातच वर्धमान होत आहे.
पण कितीही प्रहार झाले तरी वेदपु्रुष नष्ट होण्याची मला भीति वाटत नाही. वेदपु्रुष हा सनातन व अमर आहे. आतापर्यंत त्याने अत्यंत प्रहार सहन केले आहेत. वेदपु्रुषाचे चैतन्य सदैव वर्धिष्णु जयिष्णु व प्रभविष्णु राहणार यात संशय नाही.
- धुं. गो. विनोद, मिती अश्विन शु. ५ शके १८८४
ॐ ॐ ॐ
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.