You are hereअज्ञानाचे कारण / अज्ञानाचे कारण

अज्ञानाचे कारण


अज्ञानाचे कारण:
आत्म्याने आपल्या इच्छेने जो आत्मसंकोच केला त्यालाच मूळ अज्ञान म्हणतात.
अज्ञानाच्या प्रभावाने आत्म्याला मायेच्या अधीन होऊन देह धारण करणे भाग पडते. कुंडलिनी शक्तीचे अंतर्मुख, सुप्त अथबा बध्द असल्यामुळे, जीवाला खरोखरीच आपण कोण आहोत ते कळत नाही. त्याच्या ठिकाणी अंतर्ज्ञान किंवा आत्मज्ञान वा ब्रह्मज्ञान याचा अभाव असतो.
लीला करण्याच्या बहाण्याने आत्मा स्वेच्छेने आपल्याला संकुचित करतॊ. त्यामुळे त्याचे सर्व स्वाभाविक धर्म संकुचित होतात. परिच्छिन्न शक्तीमुळे क्षुद्र झालेला आत्मा मायेच्या अधीन होऊन आपणच कर्ता आहोत असे मानू लागतो. तो कर्म जंगलामध्ये प्रवेश करतो. कर्म करणे व केलेल्या कर्माची फळे भोगणे या दोन व्यापारात गुंतून जाऊन एका योनीतून दुसर्‍या योनीत जाऊन भिन्न भिन्न शरीरे धारण करून भटकत रहातो.
शाब्दिक ज्ञानाने शाब्दिक अज्ञान नष्ट होते हे खरे आहे पण त्यामुळे मूळ अज्ञान नष्ट होत नाही.
त्या अज्ञानाची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्म्याचा नैसर्गिक असा शिवस्वरूप धर्म प्रकट होत नाही.
शिव शवरूप होऊन निष्क्रिय अवस्थेत असतो.
या स्थितीत मिथ्या गोष्टींचे अवडंबर माजते. मायेचे तीव्र प्रलोभन असते व विचित्र अशा प्रपंचाची मोहिनीशक्ती सतत प्रकट होत राहते.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------