You are hereमंत्रशास्त्र आणि बुध्दिवाद / मंत्रशास्त्र आणि बुध्दिवाद

मंत्रशास्त्र आणि बुध्दिवाद


पुस्तकाचे नाव: मंत्रशास्त्र आणि बुध्दिवाद
लेखक: श्री. खरेशास्त्री
प्रस्तावना: न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद

राजकीयदृष्ट्या परोपजीवी झालेले राष्ट्र जेत्यांच्या दृष्टिकोनाने आपल्या संस्कृतीचे महत्त्वमापन करीत असते. `भारतीय संस्कृतीचे अंत:स्वरूप प्रतिगामी प्रवृत्तीचे आहे, भारतीय जीवन आंधळया धर्मश्रद्धेने बुरसटलेले आहे, भारतीय जनतेत बौद्धिकता नाही, कठोर तर्कनिष्ठा नाही, शास्त्रीय दृष्टी नाही' - असली विधाने परकीय पंडित, परकीय वृत्तनिवेदक व राजकारणी पुरूष गेली शे-दीडशे वर्षे अव्याहतपणे करीत आले आहेत. प्रचलित शिक्षणपद्धती, उघड व गनिमी पद्धतीने असल्याच मतांचा बीजारोप करीत आली आहे. दास्यात दडपलेल्या, गुलामगिरीत गारठलेल्या लोकांना स्वत:च्या सजीव अस्तित्वाचीही स्पष्ट जाणीव राहत नाही.
व्यास म्हणतात, “नरोऽपी सन् अस्वतंत्र: तस्य कीट्टक् मनुष्यता।” - परतंत्र राष्ट्र माणुसकीलाच मुकते, विचारशक्तीला विसरते, विवेकभ्रष्टांचा विनिपात शतमुखांनी, सहस्रमुखांनी होत राहतो. विवेक म्हणजे निवड करण्याची शक्ति. आपली हीच शक्ती नष्ट झाली आहे. परतंत्र, पराजित, अनुकरणात्मक वृत्तीमुळे भारतीय संस्कृतीच्या व जीवनाच्या अंगोपांगांविषयी आपल्यामध्ये जिवंत जिज्ञासा नाही, सूक्ष्म शोधकबुद्धी नाही, आपुलकीची आस्था नाही.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------