You are hereअज्ञानाची अंधकारमय स्थिती / अज्ञानाची अंधकारमय स्थिती

अज्ञानाची अंधकारमय स्थिती


अज्ञानाची अंधकारमय स्थिती

अज्ञानामुळे दिसणारे परिणाम:

  • ‘देह म्हणजेच मी’, ही भावना (देहबुध्दी) असणे
  • देहामध्ये असलेल्या इंद्रियांच्या इच्छापूर्तीकरता धडपड करणे
  • देहाशी निगडित नाती गोती यात गुंतून पडणे
  • मरणाची सतत भीती वाटणे
  • आपण अमर असावे ही खोल सुप्त इच्छा असणे
  • आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीही अमर व्हाव्यात असे वाटणे
  • मनात येणार्‍या सर्व इच्छा लगेच पूर्ण व्हाव्यात असे वाटणे
  • इतरांच्या मनासारखे झाले की त्यांच्याबद्दल असूया, मत्सर, द्वेष वाटणे
  • इच्छापूर्ती झाली की सुख आणि झाली नाही की निराशा यात जीवाने अडकून पडणे
  • सुख ज्यामुळे मिळते त्या वस्तूला, त्या व्यक्तीला धरून ठेवणे व त्याकडून सतत तसेच सुख मिळावे ही अपेक्षा करणे
  • ज्यामुळे निराशा येते त्या वस्तूविषयी व व्यक्तीविषयी द्वेष वाटणे
  • ज्या व्यक्ती व वस्तूंना धरून ठेवले आहे त्या चिरंतन नाहीत, त्यांत बदल होतो हे सत्य न पचणे
  • आपल्या सत्तेमुळे हवे ते घडून यावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हे नाईलाजाने मान्य करावेच लागणे
  • मग ज्याच्या सत्तेमुळे घटना घडून येतात त्या सत्तेला देव मानणे व तिने आपल्या मनासारखे सगळे पुरवावे हा हट्ट करणे
  • देवाने ऐकले नाही तर त्याचाही द्वेष करणे
  • शेवटी निराशा, गोंधळ, वैताग, घुसमट, सुन्नपणा, एकाकी वाटणे, सुडाची भावना, असूया, संताप, हतबलता या भावना उराशी बाळगून मृत्यूला सामोरे जाणे
  • मुळात आपण कोण, हा जन्म कशासाठी, आपण कोठून आलो, आपल्याला कोठे जायचे आहे, परमसत्ता कोणाची आहे, याकडे जीवाचे दुर्लक्ष्य होणे

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------