You are hereव्यासपूजा महोत्सव / व्यासपूजा महोत्सव

व्यासपूजा महोत्सव


१९४४-४५ मध्ये त्यांनी पुण्यामध्ये `व्यासपूजा महोत्सव' करण्यास सुरूवात केली. व्यास महर्षि हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत. त्यांचे ठिकाणी आद्य गुरू तत्त्व साकार झालेले आहे. अखिल मानवजातीचे गुरू व्यास महर्षि आहेत, त्यांचे स्मरण करण्याकरता त्यांच्या पूजेचा उत्सव सार्वजनिक रितीने साजरा होणे आवश्यक आहे असे न्यायरत्नांना वाटले.
पुढे पुढे या उत्सवाचे स्वरूप भव्य होत गेले. शेकडो अध्यात्म जिज्ञासू या दिवशी `शांतिमंदिर'मध्ये येत असत. श्रीमंत जगन्नाथमहाराज पंडित यांच्या टिळक स्मारक मंदिरात हा उत्सव संध्याकाळी जो चालू होई तो दुसऱ्या दिवशी पहाटे समाप्त् होत असे.
या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशी विद्वानांचे एक संमेलनच असे.
अनेक ज्ञानीजनांचा या व्यासपीठातर्फे सत्कार होई.
अनेक देशी-परदेशी विद्वत्जनांचे भाषण यावेळी होत असे.
मध्यरात्रीच्यावेळी संकल्पसमाधि व निर्विकल्प समाधि यांचे सामुदायिक तांत्रिक प्रयोग ते करत असत. व्यास शक्तीचे संक्रमण त्यांच्या माध्यमातून होत असे.
हे सर्व प्रयोग विनाशुल्क असत.
या कार्यक्रमांमध्ये व्याख्यानांबरोबर अनेकांची प्रवचनेही होत.
तसेच ग्रंथ प्रकाशनही होई.
याशिवाय हिराबाई बडोदेकर, मास्टर कृष्णराव, वसंतराव देशपांडे इत्यादी मोठ्या गायकांचे गाणेही होत असे.
तसेच सध्याच्या काळात विख्यात असणाऱ्या व त्याकाळी निवोदित असलेल्या अनेक कलाकारांचा पहिला जाहिर कार्यक्रम येथे झालेला आहे.
व्यासपूजेच्या दिवशी स्वत: विनोदांचे व्याख्यान
अध्यात्म,
धर्म,
मानवीजीवनाचा अर्थ,
व्यासांची शिकवण
अशा विविध विषयांवर होत असे.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------