You are hereकलावंतांशी असलेले संबंध / कलावंतांशी असलेले संबंध

कलावंतांशी असलेले संबंध


१९४४ ते १९६८ या कालावधीत व्यासपूजेला विविध कलावंतांनी सादर केलेली संगीतसेवा:

शास्त्रीय गायन:
गानहिरा हिराबाई बडोदेकर, पं. विनायकबुवा पटवर्धन, सौ. माणिक दादरकर,मा. कृष्णराव फुलंब्रीकर, श्री. केरकरबुवा, सौ. सरस्वतीबाई राणे, डॉ.वसंतराव देशपांडे, सौ. संजीवनी खेर, सौ. कमलाबाई बडोदेकर, कु. भारती कुलकर्णी, मुकुंद गद्रे, सौ. शोभना बडोदेकर, भालचंद्र जोशी, डॉ. सुधाकर मराठे, कु. श्यामला भावे, सौ. मेनका जोशी, श्री. शंकरराव पवार, श्री. सुधीर फडके, सौ. लता लिमये, श्री. दामोदर शिंदे

नवीन बोलपट व नाटके यांना आशीर्वाद:

१) १९४९, बोलपटाचे नाव: जिवासखा, कार्यक्रम: रौप्यमहोत्सव, न्यायरत्न विनोद: अध्यक्ष
२) १९४९, नाटकाचे नाव: लक्ष्मीपूजन, कार्यक्रम: मुहूर्त समारंभ, न्यायरत्न विनोद: अध्यक्ष
३) १९५०, बोलपट कंपनी:जननी कार्यक्रम: उदघाटन, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
४) १९५०, दि सोशल क्लब नाट्य संशोधन मंडळ, कार्यक्रम: ५७वा वर्धापनदिन, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
५) १९५०, चित्रपट: संत चोखामेळा, अभिप्राय:न्यायरत्न विनोद
६) १९५१, चित्रपट: जशास तसे, चित्रीकरणास उपस्थिती: न्यायरत्न विनोद
७) १९५५, चित्रपट: येरे माझ्या मागल्या, कार्यक्रम:उदघाटन, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
८) १९५५, चित्रपट: झनक झनक पायल बाजे, आशीर्वाद: न्यायरत्न विनोद
९) १९५८, नाटक: वैजयंती, लेखक:वि.वा.शिरवाडकर, नाट्यवाचनाचा कार्यक्रम, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
१०) १९५९, नाटक: झुंजारराव, कंपनी: नाट्यरंजन, उत्पन्नाची थैली अर्पण: न्यायरत्न विनोद
११) १९६१, नाटक: लग्नाची बेडी आशीर्वाद: न्यायरत्न विनोद

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------