You are hereवृत्तपत्रांनी छापलेले लेख / वृत्तपत्रांनी छापलेले लेख

वृत्तपत्रांनी छापलेले लेख


लेखक: न्यायरत्न विनोद

कालावधी: १९३५ ते १९६८

वृत्तपत्रे:
नवा काळ, प्रमोद (मुंबई), केसरी (पुणे), गोरक्षण, तरूण भारत, विशाल सह्याद्रि, सकाळ, संध्या, मराठा, नवशक्ती, लोकसत्ता, शैव समाचारपत्र

लेखांचे विषय:

१) न्याय-दर्शन (नामदेव पुण्यतिथी उत्सव)
२) सांख्य-दर्शन व आधुनिक विकासवाद (तुलनात्मक विचार)
३) साम्यवाद व मानवी संस्कृती
४) शेतकऱ्यांच्या पाठीत बगडा (गोरक्षण कायद्यानिमित्त)
५) अगस्ती दर्शन(नवीन अंक प्रकाशन)
६) श्रीरामचरित्र म्हणजे मानवाने मानवाशी कसे वागावे याचा पाठ (श्रीरामनवमी निमित्त)
७) श्रध्दा व अंधश्रध्दा (व्यासपूजा)
८) तंत्रविधीचे शास्त्र (व्यासपूजेबाबत विनोदांचा खुलासा)
९) जिज्ञासूंसाठी स्थूल विवेचन (व्यासपूजा)
१०) नामदेवांच्या एका कूट अभंगाचा अन्ययार्थ
११) अल्लीबाबा
१२) अनंतता आणि अभंग
१३) भारताचा झुंजार धर्मद्रष्टा - स्वामी विवेकानंद
१४) गौरवऋषींचे शिष्य गुरव (शैव समाचारपत्राला आशीर्वाद)
१५) अस्मदर्श
१६) भारताचे बहादूर क्रांतिवीर हुतात्मा भगतसिंग
१७) श्रीरामजन्मोत्सव
१८) दीपावलीचे अंतःस्वरूप
१९) हिमालयाच्या पायथ्याशी
२०) जपानमधील सर्वधर्मपरिषद - स्थलकालनिरपेक्ष वैदिक हिंदुधर्माचे महत्व
२१) अनंतता- एक अभिनव दर्शन
....

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------