You are hereयुगांची पाऊलें टाळूनीया संथ कालराज जात कुठे सांगा।। / युगांची पाऊलें टाळूनीया संथ कालराज जात कुठे सांगा।।

युगांची पाऊलें टाळूनीया संथ कालराज जात कुठे सांगा।।


दिव्य ते अनुभव विरूनिया गेले।
ते पुन्हां आणिले कुणीं चित्तीं ॥
गीत ते संपलें कुठूनी हे नाद।
काढिती पडसाद पुन्हां पुन्हां ॥
नेत्र कां मिटलेले, स्वप्न तें भंगले।
आयुष्य संपले श्वास कां हा? ॥४१॥

झुळूक वार्‍याची नजर त्या तार्‍याची।
मला जाचाया(य्)अशीच का? ॥
सृष्टीच्या दृश्यांनीं असे हे दुखवावे।
अनन्तेनें रहावे तसें दूर ॥
अभाग्याला नाही प्रेम तेंही ठावें।
कसें मी कंठावे आयु सांगा ॥४२॥

येथेंच दिसते हे प्रकाशाचे मूळ ।
काळी जी काजळी दिव्याची त्या ॥
निळया या बुबुळीं तेजकिरणे निघतीं।
जीवने जन्मतीं मृत्यूमध्ये ॥४३॥

पुन्हा पुन्हा यावें तुझ्या घरट्याकडे।
परी न सांपडे जीव माझा ॥
कुठेसा तेथेच ठेविला आहे मी।
मागल्याच जन्मीं असें वाटे ॥४४॥

ताडपत्र काळें निशेचें घेऊनी
लेख हा वाचुनी कोण पाही ॥
अर्धपडा लागे तारकांचा अर्थ ।
परी हा अज्ञात किती भाग ॥४५॥

रांग ही तार्‍यांची खावया बैसली।
निशा भातूकली खेळुं लागे ॥
चन्द्रिकेचें पेय पडता पानावरी ।
तारा तारा करी पान त्याचें ॥४६॥

युगांची पाऊलें टाळूनीया संथ
कालराज जात कुठे सांगा ॥
निघालाना तोही माझ्या वेशींतुनी ।
स्वशिर माझ्या चरणी ठेवुनीयां ॥
तसा आशीर्वाद त्याला दिला मीच ।
“चालू दे तो नाच तुझा स्वैर ॥
मानवांची कुलें चिरड पायांखाली ।
सृष्टीलाहि घाली तुझे फास ॥
माझ्याच आशीनें सारे चराचर ।
होऊनी हें अमर सदा नान्दे ॥
तूहि नान्द तैसा सवे त्यांच्या काला ।
गूढ माझी लीला अशी चाले” ॥४७॥

मृत्यूची पासोडी जीवनाचे तोंडी ।
टाकुनीया उघडी नेत्र माझे ॥
वस्त्र येतां आड चामड्याची दृष्टि ।
पाहावया सृष्टि अन्ध होई ॥
मृत्यूचे पटल हें जीवचक्षूपुढें ।
अमृतत्व खडे करीतसे ॥४८॥

चालतांना यावे अधान्तरी ऐसें ।
मनीं कां येतसे सदा सांग ॥
पायांनी चालतां खालची ही भूमी ।
कधीही सर्वथा न संपेल ॥
पृथ्वि ही हिंडलो जरी ना मी सारी ।
येणें तुझ्या घरी नसे शक्य ॥
स्थलातीत वास तुझा ना तो आई ।
स्थलान्तरे येई कसा जवळ ॥४९॥

नको इकडे पाहू नको मजला ध्याऊं।
नको गीत गाऊं सये, असलें ॥
प्रीतीच्या भावांनी रसरसतो नयन ।
तया माझें मन नसे योग्य ॥
निष्प्रेम जीव हा तयाला प्रार्थुनी ।
व्यर्थ कां जीवनीं कष्टतेस? ॥५०॥

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------