You are here‘स्व’ च्या सिंहासनी ‘पर’ ला बसवूं / ‘स्व’ च्या सिंहासनी ‘पर’ ला बसवूं
‘स्व’ च्या सिंहासनी ‘पर’ ला बसवूं
समाजस्थंडिली, स्वार्थाची आहुति
हीच यज्ञरिति, व्यक्तिमात्रा
तन्तुत्वाचा त्याग, पटाच्या सिद्धीला
बिन्दुत्व सिंधूला, समर्पण ॥१॥
शरीरा कारणे, इन्द्रियां गौणत्व
समाजास स्वत्व, वाहियेले
‘स्व’ च्या सिंहासनी, ‘पर’ ला बसवूं
स्व-पर लोपवू, एकत्वांत॥२॥
व्यष्टि विटेवरी, रखुमाई समष्टि
विठ्ठल परमेष्टि, शोभता न
जीवी जीवाठायी, वसे ही पंढरी
घडो तेथ वारी, सर्वकाळ॥३॥
१९२५ ऑक्टोबर
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.