You are hereमहर्षींनी केलेला अतींद्रिंय शास्त्राचा अभ्यास, संशोधन / महर्षींनी केलेला अतींद्रिंय शास्त्राचा अभ्यास, संशोधन

महर्षींनी केलेला अतींद्रिंय शास्त्राचा अभ्यास, संशोधन


सर ऑलिव्हर लॉज यांचे ग्रंथ वाचल्यामुळे विनोदांचे लक्ष अतींद्रिंय शास्त्राकडे वयाच्या १५-१६व्या वर्षी प्रथम वेधले गेले.
त्यांच्या घराजवळच्या एका चमत्कृतीपूर्ण ठिकाणी घडलेल्या काही गोष्टींमुळे त्यांची जिज्ञासा तीव्रतर होत राहिली.

पंडित मदनमोहन मालवीय यांच्या मदतीमुळे गूढविद्यांची गंगोत्री, तिबेट येथे जाण्याचा त्यांना योग आला. तिथे त्यांनी अनेक मठ व गुहा पाहिल्या. तिबेटमध्ये व हिमालयातील अनेक ठिकाणी काही सिद्धपुरूष, सिद्धीशास्त्रातील रहस्ये यांच्याशी त्यांची ओळख झाली.
तंजावर व दरभंगा येथील ग्रंथालयात अतींंद्रिय शास्त्रावर संस्कृतमध्ये लिहिलेले अनेक ग्रंथ व हस्तलिखिते त्यांनी वाचली.
प्रसिद्ध मीमांसक यामुनाचार्य यांचा `सिद्धीत्रय' हा ग्रंथ त्यांनी अभ्यासला.
इजिप्तमधील पिरॅमिडस्च्या अवतीभवती राहणारे फकीर त्यांना भेटले.
दक्षिण फ्रान्समधील सेंट बरनाडेट या पाश्चात्य महिलेने जगद्विख्यात केलेल्या `लुर्डज्' येथील अनेक चमत्कार त्यांनी पाहिले.
स्वीडन व नॉर्वे या देशातील अशीच काही अद्भुत स्थळे त्यांनी पाहिली.
रशियाच्या वायव्य सरहद्दीवरील व प्रत्यक्ष उत्तर धु्रवाजवळील प्रदेशात त्यांनी संचार केला. तेथे Lap Landers या आदिवासींच्या जातीतील काही व्यक्ती त्यांना भेटल्या. दुभाषांच्या सहाय्याने या आदिवासींना या शास्त्रातील जेवढी माहिती होती ती त्यांनी मिळविली.
जपान, फिलीपिन्स, कंबोडिया, सियाम, चीनची न्यू टेरीटरी, हाँगकाँग, ब्रह्मदेश इ. सर्व अतिपूर्वेकडील प्रदेश व आग्नेय आशियातील प्रदेशांमध्ये ते जाऊन आले. त्या त्या ठिकाणी परिणत झालेल्या अतींद्रिय अनुभवशास्त्राच्या प्रक्रिया त्यांनी पाहिल्या.

अमेरिकेत नॉर्थ क्रॅरोलिना या राज्यामध्ये असणाऱ्या ड्यूक युनिर्व्हसिटीमध्ये डॉ.ऱ्हाईन यांच्या प्रयोगशाळेमध्ये चाललेले मूलगामी संशोधन त्यांनी स्वत: पाहिले.

या संस्थेशी त्यांचे वैचारिक सहकार्य व पत्रव्यवहार शेवटपर्यंत चालू होता.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------