You are hereमहर्षीची अर्धांगी मैत्रेयी / वेणू अभ्यंकर तथा मैत्रेयी विनोद

वेणू अभ्यंकर तथा मैत्रेयी विनोद


मैत्रेयी विनोदांच्या जीवनाचा आढावा:

मैत्रेयी विनोदांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतच्या काळातील ठळक प्रसंगांचे वर्णन.
जन्म : २ सप्टेंबर १९०८, निर्वाण : २७ जून १९८१, अवघे ७३ वर्षांचे आयुष्य.
२००७-२००८ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष.
त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम-आदर-कृतज्ञता अशा प्रकारे व्यकत करण्याचा प्रयत्न.

वेणू अभ्यंकर (पूर्वाश्रमीचे नाव):

मातृभकत,
पितृभकत,
श्री रामेश्वर भक्त,
आचार्य-शिक्षक यांची कृतज्ञ,
पुण्याच्या हुजुरपागेतील, प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा वारसा चालवायचा, या जिद्दीने अभ्यास करून, संपूर्ण मुंबई जिल्ह्यात "सर्वप्रथम" येण्याचा विक्रम केलेली षोडशा,
६-१० व्या वर्षी लग्न होण्याच्या काळामध्ये, संस्कृत घेऊन बी.ए., बी.टी., एम.ए.पर्यंत, हिमतीने शिकणारी कॉलेज युवती,
पुण्यात धाडसानं फर्ग्युसनपर्यंत सायकल चालवणारी पहिली युवती,
तरूण वयात वडिलांबरोबर चार धाम, बारा ज्योतिर्लिंग,सप्त मोक्षपुऱ्य़ा, प्रसिध्द कारखाने-खाणी पहाणारी ईश्वरनिष्ठ व जिज्ञासू,
भावंड-भाचरं यांच्यावर माया करणारी बहिण व आत्या-मावशी,
मैत्रिणींवर जीव लावणारी तरूणी,
भारताच्या उत्तरेकडील परमुलखामध्ये, सावधपणे राहून, आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारी स्वावलंबी आत्मनिर्भर युवती,
परमुलखामध्ये आपले काम चोख करणारी शिक्षिका,
----------------------------------------

मैत्रेयी विनोद

२८ व्या वर्षी स्वतंत्रपणे मुंबईत न्यायरत्नांची भेट घेऊन, त्यांच्याशी साधक-बाधक चर्चा करून, शिवाय घरातल्या पोक्त माणसांचा सल्ला घेऊन, तिजवर असणाऱ्य़ा परंतु अतिशय बुध्दिमान व तत्वज्ञानी, संवदनशील, परा पातळीवर असणाऱ्या विद्वानाला आपले सर्वस्व देण्याचे धाडस करणारी प्रौढ वधू,

आपल्याच माहेरच्या माडीवर, नोंदणी पध्दतीने सगोत्र विवाह करून, जमलेल्या विद्वान-संन्यासी-यशस्वीपणे संसार केलेल्या अनुभवी हितचिंतकांच्या साक्षीने, विनोदांची झालेली त्यांची गृहलक्ष्मी,

सावत्र मतिमंद मुलावर प्रेमाची सावली धरणारी सहनशील व संयमी माता,

विधवा वयस्कर नणदेला समंजसपणे व मानानं वागवणारी भावजय,

गोवर्धन संस्थेच्या, गोवध-बंदीच्या राष्ट्रीय कार्याला वाहून घेतलेल्या, आपल्या जोडीदाराला, विविध प्रभावी राजकीय पुढाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी, देशभर प्रवास करायला, आनंदाने मोकळीक देणारी नवी नवरी,

सर्व घरकाम करणे, ६ मुलांना वाढवणे, शाळेत शिक्षिकेची नोकरी करणे, आपल्या पगारावर घर काटकसरीने चालवून, शिवाय शिल्लक बाजुला टाकणे, सर्व कुळधर्म-कुळाचार व अनेक व्रत-वैकल्य वेळच्या वेळी आणि अतिशय श्रध्देने करणारी सुपरवुमन,

आपल्या मुलांचे सोळा संस्कार, पहिले सर्व सण- बोरनहाण, संक्रांत-हलव्याचे दागिने, फुलांची वाडी भरणं इ. हौशीनं करणारी माऊली,

अडल्या-पडल्याला मदतीचा हात सहजतेने देणारी उदार गृहिणी,

ओळखीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घर उपलब्ध करून देणारी उदारा,

विश्व-शांति-दूत म्हणून, ६ महिन्यांसाठी गेलेल्या न्यायरत्नांना सर्व देशांना भेटी द्यायला व अतिंद्रिय शक्तींवर संशोधन करायला, ३ वर्षे लागली....या कठीण काळात, आसपासच्या माणसांचे खरे रूप दिसल्यावर, न डगमगता आंतरिक सामर्थ्याच्या व ईश्वरनिष्ठेच्या पाठबळावर सर्व संसार करणारी धुरंधर,

वडिलांच्या कडक शिस्तीत बालपण-तारूण्य घालविल्यानंतर, अतिशय मृदू अंतःकरणाच्या समंजस व परिपक्व न्यायी जोडीदाराच्या सहवासात, सर्वांगानं फुललेली विवाहिता,

गोवर्धन महिला परिषद व पुना विमेन कौन्सिल या संस्थांमध्ये, आपले आजीवन योगदान दिलेली सामाजिक कार्यकर्ती,

शिक्षणखात्यातील अधिकाऱ्याचा अन्याय, ही, अधिक चांगले काम करण्याची संधी मानणारी, धैर्यशाली शाळा-तपासणी-अधिकारी,

रोज पहाटे उठून, नृसिंहाच्या देवळात, श्री. गणेशशास्त्री जोशींची ज्ञानेश्वरीवरील प्रवचने अभ्यासण्यासाठी जाणारी हरिभक्त,

ट्रेनिंग कॉलेज फॉर विमेन मधून, प्रिन्सिपॉल म्हणून सेवा-निवृत्त झाल्यावर, पुणॆ बहिःशाल व्याख्यानमालेत, सर्व खानदेशभर, "गीतार्थ व गीता-तत्वज्ञान" या विषयावर प्रवचने करणारी व्याख्याती,

चाळीशी नंतर, आपल्या जोडीदाराला गुरूस्थानी मानणारी व त्याची सेवा करायला वेळ मिळत नाही आणि त्यांची अ-लौकिक प्रतिभा आपण समजू शकत नाही, म्हणून हुरहुरणारी, मुमुक्षू,

पाचही मुलांना विविध क्षेत्रांत पदव्युत्तर शिक्षण देणारी सबल माता,

पुण्यात, भली मोठी कार चालविणारी पहिली महिला,

आपल्या लोक-विलक्षण पतीच्या आकस्मित निधनानंतर घायाळ झालेली शोकविव्हल पत्नी,

आपल्या प्रेमळ जोडीदाराबरोबरचा आपला सहवास व संवाद अपुरा राहिल्याची खंत, शेवटपर्यंत बाळगणारी विरहिणी,

वाढत्या महागाईला, आपल्या तुटपुंज्या पेन्शनने कसे तोंड द्यावे, या विवंचनेत पडलेली व सायकलने जाणारी, वृध्दा,
काही नास्तिक समाजकंटकांनी दुष्टबुध्दीने न्यायरत्नांच्या अतिंद्रिय शक्तीची केलेली विटंबना मुकाट्यानं सोसणारी क्षमाशील,

पतिमागे, अमेरिकेतील दोन मुलगे व पुण्यातील दुसरी मुलगी यांचे विवाह पाहिलेली व नातवंडांत रमलेली आजी,

न्यायरत्नांप्रमाणेच शक्य तेव्हढी पृथ्वी-प्रदक्षिणा केलेली पर्यटक,

अखेरचे दिवस जवळ आल्यावर, मायदेशात देह ठेवण्यासाठी आलेली स्वदेशाभिमानी,

आपल्यासाठी कोणाला आर्थिक व देहाचे कष्ट होऊ नयेत म्हणून जपणारी, स्वावलंबी व स्वाभिमानी पेशंट,

सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे मिळाले ती "ईश्वरकृपा", व त्याबद्दल कृतज्ञता बाळगणारी, आणि, जे सोसले ते, प्रारब्ध, असे मानणारी खरी गीताभ्यासू,

अतिशय शांतपणे व समाधानाने, परमेश्वराचे नामस्मरण करीत, मृत्यूला सामोरं गेलेली, व, अवघ्या जन्माचे सोनं झालेली, भक्तियोगी.

.....

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml