या वर्षी ६ जुलै रोजी व्यासपूजेचा उत्सव संपन्न होईल.
या उत्सवाची सुरुवात महर्षी विनोदांनी १९४५ या वर्षी प्रथमच केली.
यंदाचे हे वर्ष ६५ वे आहे.
हा कार्यक्रम रात्रौ ८=०० वा सुरु होऊन तो १२=३० वा संपेल.
या रात्रीचा पूर्ण चंद्र संकल्प व निर्विकल्प समाधीच्या तांत्रिक प्रयोगासाठी आवश्यक असतो.
त्यामुळे तिथीने ७ जुलैला पौणिमा असली तरी उत्सव ६ जुलैला मध्यरात्री उत्सव संपन्न होईल.
कार्यक्रम:
शांतिपाठ, श्रीगुरुपादुकापूजन,
प्रास्ताविक - अदिती वैद्य (ज्येष्ठ वकील)
प्रकाशन समारंभ: महर्षी विनोदांच्या उन्मनी अवस्थेतील श्लोकांच्या सी.डी. चे प्रकाशन "कुंडलिनी जागृती - नाथप्रसाद"
डॉ. वि.य. तथा भाऊ कुलकर्णी (ज्ञानेश्वरी व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक) यांचे व्याख्यान
डॉ. संप्रसाद विनोद यांचे प्रकट चिंतन
महर्षि विनोद यांचा ध्वनीमुद्रित आशीर्वाद
संकल्प समाधी व निर्विकल्प समाधी तांत्रिक प्रयोग