You are hereशब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांच्या चतुष्कोणात अर्थप्राप्तीच्या सर्व साधना सामावल्या जातात. / शब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांच्या चतुष्कोणात अर्थप्राप्तीच्या सर्व साधना सामावल्या जातात.

शब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांच्या चतुष्कोणात अर्थप्राप्तीच्या सर्व साधना सामावल्या जातात.


(९)
शब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांच्या चतुष्कोणात अर्थप्राप्तीच्या सर्व साधना सामावल्या जातात. हे चारी प्रकार, वस्तूंचे ज्ञान स्पष्टतर करतात. निरुक्तिदृष्ट्या बहुतेक सर्व शब्द ही रूपके, प्रतीके अथवा प्रतिमा असतात.
‘सरित्’ हा शब्द, सरणार्‍या, वाहणार्‍या पाण्याचे रूपक, प्रतीक व प्रतिमा या तीनही तत्त्वांना सुचविणारा आहे, हे खरे. पण नुसते, त्या एका शब्दाने होणारे ज्ञान तितकेसे परिणामकारक नाही.
रूपके, प्रतीके व प्रतिमा ही तीन साधने ज्ञानाला चित्रमय स्वरूप देतात. रूपक हे कथात्मक पद्धतीने ज्ञान देते. रूपकाचे लक्षण मम्मटाने पुढील शब्दांत दिले आहे. ‘तद्रूपकमभेदो य उपमानोपमेययो:।’ मुख आणि चंद्र यांच्यामधला अभेद दर्शविणारे रूपक, ‘मुखचंद्र’ या शब्दाने सिद्ध होते. येथे ‘मुखचंद्र’ हा शब्द, हेच रूपक आहे. चंद्र हे उपमान, मुख हे उपमेय, यांच्यातील अद्वैत येथे दर्शविले गेले आहे.
प्रतीक म्हणजे प्रतिनिधित्व करणारे सूचक चिन्ह. मूलवस्तूचे प्रतीक, हे सर्वांगीण सूचना करते. मात्र ते रहस्य-दर्शक असल्यामुळे मूळ वस्तूसारखे आकाराने विशाल व स्थूल नसते, ते सूक्ष्म व सूचक असते.
‘मंगल-मूर्ती’ हा शब्द किंवा ‘सन्त-चरण-रज’, ‘धवल-गिरी’ हे शब्द, प्रतिमेची उदाहरणे आहेत. प्रतिमा ही पूर्णपणे मानस-प्रत्यक्षात येऊ शकतात. प्रतिमा म्हणजे संपूर्ण शब्द-चित्र. प्रतीक हे पूर्णतया, वस्तूला मानस-प्रत्यक्षात आणीत नाही.
प्रतीक हे मूलवस्तूचे निर्देशक असते. पण शब्दापेक्षा ते अधिक अर्थसंग्राहक असते. प्रतीक हे संकलित स्वरूपाचे, संपूर्ण स्वरूपाचे बोधक असते. प्रतिमा ही संकलित स्वरूपाची साक्षात मूर्ती होय. प्रतिमेच्या ठिकाणी वस्तूचे संपूर्ण प्रात्यक्षिक व प्रतिनिधित्व असते.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------