You are hereभवानी पूजेला, आणिले भंडार। वासनांना ठार, करूनीयां।। / भवानी पूजेला, आणिले भंडार। वासनांना ठार, करूनीयां।।
भवानी पूजेला, आणिले भंडार। वासनांना ठार, करूनीयां।।
भवानी पूजेला, आणिले भंडार।
वासनांना ठार, करूनीयां ॥
मेलेल्या इच्छांनीं, रक्ताळले चित्त।
संपादिलें वित्त, विरक्तीचें ॥१॥
सखे अनंतते, असला जीवात्मा हा।
तुझ्या पायीं वहावा, हीच इच्छा ॥
प्रकार प्रेमाचे, पाहुनी भोंवती।
अंतरीची खंती, सदा वाढे ॥२॥
द्रव्य वा शरीर, प्रेम तें तयांवरी।
सर्व जनता करी, भ्रांति योगें ॥
दोन आत्म्यांचें जें, दिव्य एकीकरण।
प्रेम ते चुंबन, अतींद्रिय ॥३॥
विरोधी भावांनी, विनटलेला जीव।
सांडितो न शीव, संशयांची ॥
हंसे तोंडावरी, फाकलेलें दिसे।
अंतरी कांहीसे, परी दु:ख ॥४॥
समजल्या सत्याचा, काही एक प्रांत।
राहतो अज्ञात, बुद्धीला या ॥
दोन जीवांमध्ये, फुलेल्या प्रेमाला।
वास केव्हा आला, पूर्णतेचा ॥५॥
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.