You are hereमहर्षी विनोदांचे थोडक्यात वर्णन / महर्षी विनोदांचे थोडक्यात वर्णन

महर्षी विनोदांचे थोडक्यात वर्णन


१२ जानेवारी १९०२ ते १३ जुलै १९६९ (अवघ्या ६७ वर्षांचं आयुष्य)
कोकणातील ग्रामीण भागातून आलेला मुंबईत शिक्षण घेणारा युवक,
हळव्या मनानं इंग्रजीतून कविता करणारा कवि,
अंमळनेर तत्वज्ञान मंदिरात राहून 'पी.एच.डी.' मिळवणारे तत्वज्ञानी,

थोर देशभक्त, शहीद, भगत सिंगांच्या अंतरंगातील कडवे क्रांतिकारक,

४ वर्षे भूमिगत राहून, हिमालयामध्ये (भारत व तिबेट) सर्वदूर व अगम्य ठिकाणी पदभ्रमण केलेला, सद्गुरूंचा शोध घेणारा साधक-यात्री,

अनंतता-क्षुद्रता-ब्रह्मास्मि या विषयांवर अभंग रचणारा व ते गुणगुणणारा संत,

नाथपंथातील थोर सिध्दपुरुष (शंकरदास),

देशोदेशी विद्वत्-सभा गाजवणारा उत्तम वक्ता,

षट्-दर्शनांचे जाणकार-'दर्शनालंकार',

करवीर पीठाच्या शंकराचार्यानी गौरविलेले 'न्यायरत्न',

३ वर्षे, जगातील प्रत्येक देशात शांतिचा संदेश देणारे व टोकियो मध्ये गौरविलेले 'विश्व-शांति-सचिव',

विविध देशांतील, दुर्गम स्थळी असणार्‍या व अतींद्रिय शक्ती असणार्‍या साधू-संत-सत्पुरुष-सिध्द-महात्मे यांच्याशी भेट-चर्चा केलेले जिज्ञासू,

न्यूयॉर्क मधील आधुनिक व अभिनव प्रयोगशाळेत, डॉ. फायफर यांना, स्वतःच्या अतींद्रिय शक्तींवर संशोधन करू देणारे महान योगी,

डॉ. फ्रॉईड प्रणीत संस्थेमध्ये सायकोएनालिसिस या विषयात पी.एच.डी. केलेले 'सायकोथेरपीस्ट',

नोबेल विजेते डॉ. आईन्स्टाईनशी गणित विषयावर चर्चा करणारे संशोधक,

देशोदेशीच्या विद्वान-साहित्यिक-तत्वज्ञानी-विचारवंत-समाजसुधारक-कलावंतांशी अंतरंगाचं नातं असणारा सुहृद,

ग्रामीण अशिक्षित शेतक-यापासून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीशी आपुलकीचा संवाद साधू शकणारा साधू,

भारतीय ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यासू,

मंत्रशास्त्र-तंत्रशास्त्र-यंत्रशास्त्र जाणणारी अधिकारी व्यक्ती,

कनवाळू अंतःकरणाची, भक्तवत्सल गुरू-माऊली,

वाचकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, उच्च साहित्यिक मूल्ये जपून, ग्रंथ-निर्मिती करणारा साहित्यिक,

व्यासपूजा महोत्सव १९४३ मध्ये प्रथमच सुरू करणारा कृतज्ञ,

बुध्द-पौर्णिमा, आद्य शंकराचार्य पुण्यतिथी यांचे उत्सव सुरू करणारा उत्सव-प्रेमी,

३० हून जास्त लेखकांच्या पुस्तकांना आशीर्वाद देऊन, तात्विक भूमिकेतून आपले विचार पोचविणारा विचारवंत,

उपस्थितांच्य़ा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले विनोदी व्यक्तिमत्व,

पुणे महानगरपालिकेने गौरवलेले अध्यात्म-महर्षी,

अलिबाग नगरपालिकेने गौरवलेले कोकण-सुपुत्र,

मातृ-पितृ भक्त, प्रेमळ बंधू, पति व पिता.

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml